गुरुवार, 14 ऑगस्ट 2025 – शहराचे पोलीस आयुक्त यांनी निरीक्षण गृह व बालगृह (मुले) यांना सदिच्छा भेट दिली. त्यांनी संस्थेची पाहणी करून मुलांशी संवाद साधला आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेतली.
आयुक्तांनी मुलांना शिस्त, प्रामाणिकपणा आणि शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी मुलांना कठोर परिश्रम करून चांगले नागरिक बनण्याचे आवाहन केले. या भेटीमुळे मुलांना नवी प्रेरणा मिळाली आणि त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला.